जिल्हा वाशिम

(2) लोकसंख्या

2.1 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या

 

  2001 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 10,20,216 एवढी आहे.

त्यामध्ये पुरुष 5,26,094 4,94,122 स्त्रिया आहे

  2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 1197160 एवढी आहे.

त्यामध्ये पुरुष 620302 576858 स्त्रिया आहे.

  ही लोकसंख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 1.06 टक्के आहे.

 

2.2 लोकसंख्येची घनता

 

  2001 च्या जनगणनेनुसार दर चौ.कि.मी.मध्ये

या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता 196 इतकी आहे.

  2011 च्या स्थायी जनगणनेनुसार जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5196 चौ.कि.मी.

असून एकूण लोकसंख्या 1197160 इतकी आहे.

  दर चौ.कि.मी.मध्ये या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता 230 इतकी आहे.

 

2.3 ग्रामीण नागरी लोकसंख्येचे प्रमाण

 

v  2001 च्या जनगणनेनुसार वाशिम जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 10,20,216 एवढी आहे.

त्यापैकी ग्रामीण लोकसंख्या 8,41,771 नागरी लोकसंख्या 1,78,445 एवढी आहे.

v  2011 च्या जनगणनेनुसार वाशिम जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 1197160 एवढी आहे.

त्यापैकी ग्रामीण लोकसंख्या 9,85,747 नागरी लोकसंख्या 2,11,413 एवढी आहे.

v  त्या अनुषंगाने ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 82.34% नागरी लोकसंख्येचे प्रमाण 17.65% इतकी आहे.

 

 

 

 

2.4 स्त्री-पुरुष प्रमाण

 

         2001 च्या जनगणनेनुसार वाशिम जिल्ह्यात दर हजारी पुरुषामागे 939 स्त्रियांचे प्रमाण होते.

         2011 च्या जनगणनेनुसार वाशिम जिल्ह्यात दर हजारी पुरुषामागे 926 स्त्रियांचे प्रमाण आहे.

         राज्यामध्ये 925 स्त्रिया एवढे आहे.

 

2.5 अनुसूचित जाती-जमाती

 

         2011 च्या जनगणनेनुसार वाशिम जिल्ह्यातील

         अनुसूचित जातीची लोकसंख्या 2,29,462

         अनुसूचित जमातीची लोकसंख्या 80,471 आहे.

         अनुसूचित जाती-जमातीचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण अनुक्रमे 19.16% 6.72% आहे.

         महाराष्ट्र राज्याचे हेच प्रमाण अनुक्रमे 11.81% 9.35% असे आहे.

 

2.6 नागरी ग्रामीण साक्षरता

 

  2001 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या 73.40% लोक साक्षर असून

त्यातील ग्रामीण भागात 57.60% नागरी भागात 82.40% लोक साक्षर होते.

  2011 च्या जनगणने प्रमाणे एकूण लोकसंख्येच्या 72.56% लोक साक्षर असून

त्यातील ग्रामीण भागात 71.83% नागरी भागात 76.81% आहे.

  स्त्री पेक्षा पुरुषात साक्षरतेचे प्रमाण जास्त असून साक्षरतेमध्ये

56.13% पुरुषे 43.87% स्त्रिया आहेत.